esakal | साई़डपट्ट्या भरण्यापूर्वीच राज्यमार्ग अनेक ठिकाणी उखडला
sakal

बोलून बातमी शोधा

The state highway was demolished in many places even before the sidewalks were filled

संगमनेर या मध्यवर्ती शहराला राज्याशी जोडणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गाची नव्याने डागडुजी सुरु असतानाच केलेल्या कामाचे धिंडवडे निघाले आहेत.

साई़डपट्ट्या भरण्यापूर्वीच राज्यमार्ग अनेक ठिकाणी उखडला

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर या मध्यवर्ती शहराला राज्याशी जोडणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गाची नव्याने डागडुजी सुरु असतानाच केलेल्या कामाचे धिंडवडे निघाले आहेत. तालुक्याच्या हद्दीतील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे व रस्ता खचल्याने त्याची दुरवस्था झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांना जोडणारा कोल्हार घोटी राज्यमार्ग हा प्रमुख मार्ग आहे. संगमनेर या जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणाला नगर, सोलापूर, मनमाड, नाशिक, कल्याण, पुणे, आळेफाटा, मुंबई या शहराला जोडणारा हा राज्यमार्ग मोठा वर्दळीचा म्हणून गणला जातो.

जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी तसेच शनी शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांमुळे या रस्त्याचे महत्व वाढले आहे. दैनंदीन वाहतुकीसह अवजड वाहतुकीचा मोठा भार असल्याने हा रस्ता कायमच दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असतो. काही वर्षापूर्वी कोल्हार लोणी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या व्यवस्थापनाने या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करुन या रस्त्यावरील वडगावपान या ठिकाणी टोलनाका सुरु केला होता.

टोलवसुली सुरु असताना या रस्त्याची वेळोवेळी दुरुस्ती होत असे. मात्र टोलनाका बंद झाल्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. प्रवाशी वर्गाची मागणी वाढल्याने सुमारे दिड वर्षापूर्वी या रस्त्याचे संगमनेर तालुका हद्दीतील निमगावजाळी पासून मजबुतीकरण करण्यात आले. तीन टप्प्यात झालेले हे काम अद्यापही संगमनेर शहर हद्दीत अपूर्णावस्थेत आहे.

सुरवातीच्या काळात झालेल्या रस्त्याच्या कामातील साईडपट्ट्या भरण्याचे काम मागिल आठवड्यात सुरु होते. मात्र हा रस्ता कोंची गावाजवळचे धोकादायक वळण व घाटासह निझर्णेश्वर परिसर, कोकणगाव, वडगावपान फाटा, पेट्रोलपंप व समनापूर गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खचल्याने तसेच लहान मोठ्या असंख्य खड्ड्यांमुळे धोकादायक ठरत आहे. अल्पावधीत रस्ता खचल्यामुळे प्रवासी वर्गातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर