पाथर्डीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसण्यात येणार

राजेंद्र सावंत
Monday, 7 September 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या आवारात बसविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंचायत समितीने प्रस्ताव सादर केलेला आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार महापुरुषाचा पुतळा बसवायचा आहे त्यांचा दोन किलोमीटरवर पहीला पुतळा बसविलेला नसावा अशी अट आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या आवारात बसविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंचायत समितीने प्रस्ताव सादर केलेला आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार महापुरुषाचा पुतळा बसवायचा आहे त्यांचा दोन किलोमीटरवर पहीला पुतळा बसविलेला नसावा अशी अट आहे. त्यासाठी सराकारी पातळीवर आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यामातुन पाठपुरावा करीत आहोत. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी आम्हीही आग्रही आहोत. कृपया त्यासाठी अंदोलने करु नये, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सुनिता गोकुळ दौंड यांनी केले आहे. पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलेला आहे. ती इमारत जुनी झाल्याने पंचायत समितीने नवीन इमारत बांधली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिका-यांकडे पुतळा बसविण्यासाठी परवानगी मिळावी असा प्रस्ताव पाठविला होता. 

जिल्हाधिकाऱ्यांनी सराकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचे स्मरणपत्र पंचायत समितीला दिले आहे. आम्ही सभागृहात ठराव करुन प्रस्तावातील बहुतेक अटीबाबत परवानग्या घेतल्या आहेत.

सरकारची एक अट अशी आहे ज्या महापुरुषाचा पुतळा बसवायचा आहे त्यांचा पुर्वी दोन किलोमिटरच्या आतमध्ये पुतळा बसविलेला नाही, असा स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखला देण्यात यावा अशी आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर आमचा पाठपुरावा सुरु आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पदाधिकारी महराजांचा पुतळा लवकरात लवकर बसविण्यासाठी प्रयत्न करीत अहोत असे दौंड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be installed in Pathardi