esakal | निवडणुकीतील खरा ग्राऊंड रिपोर्ट काँग्रेस नेत्याला देऊन गेला आमदारकी
sakal

बोलून बातमी शोधा

The story of Congress leader Ramhari Rupanwar from Malshiras

कोणत्याही निवडणुकीत ग्राऊंड रिपोर्ट महत्त्वाचा असतो. त्यावरच पक्ष आपली रणनिती आखत असतो. परंतु हा रिपोर्टच योग्य नाही मिळाला तर पक्षाचे निर्णय फसतात.

निवडणुकीतील खरा ग्राऊंड रिपोर्ट काँग्रेस नेत्याला देऊन गेला आमदारकी

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : कोणत्याही निवडणुकीत ग्राऊंड रिपोर्ट महत्त्वाचा असतो. त्यावरच पक्ष आपली रणनिती आखत असतो. परंतु हा रिपोर्टच योग्य नाही मिळाला तर पक्षाचे निर्णय फसतात. बहुतांश निरीक्षक आपल्याच पक्षाला कसे चांगले वातावरण आहे हे भासवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एका नेत्याना सोनिया गांधी यांना खरा ग्राऊंड रिपोर्ट दिला आणि तो खरा ठरला. त्याची त्यांनी दखल घेतली आणि त्यांना आमदार केले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकत काँग्रेसचे ॲड. रामहरी रुपनवर यांनी भाकित व्यक्त केले होते. ते खरे ठरले. त्याची दखल काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी घेतली आणि त्यांना आमदारकी दिली. या निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा येतील असे चित्र होते. अन्‌ निकालात ते खरे ठरले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आणि नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. कोणाच्या स्वप्नातही नसेल एवढ्या कमी जागा या निवडणुकीत काँग्रेसला मिळाल्या होत्या. अशा स्थितीत त्यावेळचे प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. रामहरी रुपनवर यांनी काँग्रेसला फक्त दोन जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक सोनिया गांधी यांनी घेतली होती. त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात काय स्थिती आहे. यावर विचारले होते. यावर अनेकांनी आपापले अंदाज सांगितले होते. त्यात काँग्रेसला केवळ दोनच जागा मिळतील असे ॲड. रुपनवर यांनी सांगितले होते. आणि निकालात ते खरं झालं. त्यावर सोनिया गांधी यांनी ॲड. रुपनवर यांना आमदार करण्यास सांगितले होते. बदलाचे वारे आणि त्यावेळसचे वातावरण पाहुन अंदाज व्यक्त केला होता. त्यावर मला अनेकांनी मॅडमला अशी माहिती का सांगितली, असं म्हणाले. पण मी मात्र, माझं मत सांगितले, असं उत्तर नेत्यांना दिले होते, असे ॲड. रुपनवर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

ॲड. रुपनवर म्हणाले, मोहन प्रकाश हे तेव्हा प्रभारी होते तर माणिकराव ठाकरे हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. तेव्हा सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, आपल्याला असेच खरी माहिती सांगणारे कार्यकर्ते हवेत. त्यांना आमदार बनवा.