esakal | कोरोनामुळे अहमदनगर शहरात कडकडीत नि"र्बंद", कापडबाजारात शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

Strict restrictions in Ahmednagar city

चौपाटी कारंजा ते दिल्लीगेट, माळीवाडा बसस्थानक परिसर, माळीवाडा वेस आदी ठिकाणी फळविक्रेते उभे होते.

कोरोनामुळे अहमदनगर शहरात कडकडीत नि"र्बंद", कापडबाजारात शुकशुकाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आजपासून 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे शहरातील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सोडता सर्व दुकाने बंद झाली.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचा आदेश येताच व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. शहरातील कापड बाजार, मोची गल्ली, नवीपेठ, माणिकचौक, माळीवाडा, पंचपीर चावडी, मंगळवार बाजार, सराफ बाजार आदी बाजार बंद होते. किराणा माल, मेडिकल दुकाने, किराणा व मेडिकल दुकानांचे ठोक व्यापारी यांची दुकाने खुली होती. त्यामुळे आडतेबाजार, डाळमंडई, मार्केट यार्डमध्ये नेहमी प्रमाणे ग्राहकांची रेलचेल होती.

चितळे रस्त्यावरील किरणा व मेडिकल व्यतिरिक्‍त दुकाने बंद होती. शहरातील मार्केट यार्ड, चितळे रस्ता, गंजबाजार, गाडगीळ पटांगण येथील भाजीबाजार सुरू होता. चौपाटी कारंजा ते दिल्लीगेट, माळीवाडा बसस्थानक परिसर, माळीवाडा वेस आदी ठिकाणी फळविक्रेते उभे होते. किराणा दुकान, खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स, मेडिकल, हॉस्पिटल आदी अत्यावश्यक सेवा वगळत इतर दुकाने बंद आहेत.

loading image