‘ही बाब घरी सांगू नको' असे म्हणून पीडित मुलीला धमकी; एकाला सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात दोषी धरत जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला २० वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड केला.

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात दोषी धरत जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला २० वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड केला. अफसर लतीफ सय्यद (वय 26, रा. भराड गल्ली, तोफखाना, नगर) असे आरोपीचे नाव आहे. 

अधिक माहिती अशी ः आरोपी अफसर लतीफ सय्यद याने 15 सप्टेंबर 2018च्या अगोदर तीन-चार दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीची छेड काढली. "ही बाब घरी सांगू नको' असे म्हणून पीडित मुलीला धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी अफसर सय्यद याने पीडित मुलीवर अत्याचार केला, असे तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आणि तपास करून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने मांडलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी बाजू मांडली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict wages from District Sessions Court for abusing girl