पालक संमतिपत्रच देईना, शाळांची उपस्थिती यथातथाच

दौलत झावरे
Monday, 14 December 2020

जिल्ह्यात माध्यमिकच्या एक हजार 209 शाळा असून, त्यांमध्ये 16 हजार 877 शिक्षक आहेत. त्यांतील 14 हजार 919 शिक्षकांची चाचणी झाली आहे.

नगर ः राज्य सरकारच्या निर्देशानुसार शाळा सुरू झाल्या असल्या, तरी अद्याप चांगला प्रतिसाद दिसत नाही. जिल्ह्यात सध्या अवघ्या 515 शाळा सुरू असून, 21 हजार 875 विद्यार्थी ऑफलाइन शिक्षण घेत आहेत.

सुमारे 45 हजार 659 पालकांनी संमतिपत्रे भरून दिली आहेत. सोळा हजार 877 शिक्षकांपैकी चौदा हजार 919 शिक्षकांची कोरोना चाचणी केली आहे. त्यात सुमारे 153 शिक्षक बाधित आढळून आले आहेत. 

जिल्ह्यात एक हजार 209 शाळा आहेत. सरकारने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात 2 लाख 84 हजार 354 विद्यार्थी आहेत. राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे.

हेही वाचा - व्हिडिओ काढून मुलीवर अत्याचार

जिल्ह्यात माध्यमिकच्या एक हजार 209 शाळा असून, त्यांमध्ये 16 हजार 877 शिक्षक आहेत. त्यांतील 14 हजार 919 शिक्षकांची चाचणी झाली आहे. त्यात आतापर्यंत 153 जणांचे अहवाल बाधित आले असून, अनेक कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. 

जिल्ह्यात 515 शाळांमध्ये ऑफलाइन व ऑनलाइन, असे दोन्ही अध्यापन सुरू असून, 21 हजार 875 विद्यार्थी शाळेमध्ये येत आहेत. उर्वरित शाळांमध्ये फक्त ऑनलाइनच अध्यापन सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-जास्त होत आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. 

संमतिपत्रात संगमनेरची आघाडी 
जिल्ह्यात संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक विद्यार्थी शाळेत येत असून, संमतिपत्रांतही संगमनेर तालुक्‍याने आघाडी घेतली आहे. संगमनेर तालुक्‍यात तीन हजार 466 विद्यार्थी शाळेत येत असून, आठ हजार 393 पालकांनी संमतिपत्रे भरून दिली आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students do not come to school due to corona disease