महादजी शिंदे विद्यालयात विद्यार्थी गिरवतायत शेतीचे धडे

Students of Mahadji Shinde Vidyalaya in Shrigonde have sold the vegetables
Students of Mahadji Shinde Vidyalaya in Shrigonde have sold the vegetables

श्रीगोंदे (अहमदनगर) : येथील महादजी शिंदे विद्यालयात विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याची विक्री करण्यात आली. कोरोना काळ सुरू असल्याने भाजीपाल्याची विक्री ठराविक पालक व शिक्षक यांना करण्यात आली.

रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'फाली' (FAALI) 'भविष्यातील शेतीचे नायक' हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी महादजी शिंदे विद्यालय उभारलेल्या शेडनेटमध्ये शेतीचे आधुनिक प्रशिक्षण दिले जाते. रासायनिक खतांचा वापर न करता जैविक शेती केली जाते. गेल्या दोन वर्षांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावरील प्रदर्शनात 'आधुनिक खुरपे' आणि 'ड्रॅगाज्यूस' हे दोन नावीन्यपूर्ण उत्पादने संशोधन करून सादर केली त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले.

गतवर्षी या उपक्रमात 15 प्रकारच्या गुलाब रोपांची लावणी करून उत्पादन घेण्यात आले होते. यावेळी मेथी, शेपू व कोथिंबीर या पालेभाज्यांचे उत्पादन घेतले गेले. उत्तम नियोजन व उत्कृष्ट दर्जा हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या उपक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख शिवाजी थिटे व किशोर सोलाट यांनी केले. 
प्राचार्य नवनाथ बोडखे, उपप्राचार्य बाळासाहेब जाधव, पर्यवेक्षक उत्तम बुधवंत उपक्रमास मार्गदर्शन करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com