
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी सक्ती करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने केली.
विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये उपस्थित राहण्यासाठी सक्ती नको
श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी सक्ती करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने केली.
याबाबत संघटनेतर्फे शहरातील सर्व महाविद्यालयांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात पुढील आठ दिवस बंद पाळला जाणार असल्याने महाविद्यालयांतही नियमांचे पालन करावे लागेल. यामुळे सद्यःस्थितीत महाविद्यालयांत ऑनलाइन तासिका घेऊन विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश क्षीरसागर, तालुका कार्याध्यक्ष रोनित घोरपडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अमित हाडके पाटील, यश खैरनार, नयन शिंदे, विराज नवले यांनी केले.
संपादन : अशोक मुरुमकर
Web Title: Students Should Not Be Forced Attend College
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..