The sub district hospital at Karjat has received approval from the Health Services Commissionerate to add 100 beds
The sub district hospital at Karjat has received approval from the Health Services Commissionerate to add 100 beds

उपजिल्हा रुग्णालयास वाढीव शंभर बेड; आमदार पवारांच्या पाठपुराव्याला आले यश

Published on

कर्जत (अहमदनगर) : येथील उपजिल्हा रुग्णालयास विशेष बाब म्हणून शंभर बेड वाढविण्यास आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाली आहे. रुग्णालयाच्या इमारतीस व वाढीव मनुष्यबळासही लवकरच मान्यता मिळेल. आमदार रोहित पवार यांनी याप्रश्‍नी पाठपुरावा केला होता. 

कर्जत तालुका अवर्षणप्रवण आहे. त्यामुळे येथे खासगी रुग्णालयांचे प्रमाणही कमी आहे. नागरिकांची आरोग्य सेवेसाठी सर्व भिस्त तालुक्‍यातील उपजिल्हा रुग्णालयावर असते. सध्या रुग्णालयास 50 बेड मंजूर आहेत. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडचा तुटवडा जाणवत आहे. त्यातून रुग्णांना तत्काळ आरोग्य सुविधा मिळण्यास अडथळे येत आहेत. 
 
याची दखल घेऊन आमदार रोहित पवार यांनी बेड वाढविण्यासाठी पाठपुरावा केला होता. विशेष बाब म्हणून या रुग्णालयास शंभर बेड वाढविण्यास आरोग्य सेवा आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे.  रुग्णालयासाठी अत्याधुनिक इमारत व मनुष्यबळ वाढविण्यासही लवकरच मान्यता मिळणार आहे. वाढीव बेड मंजूर झाल्याने नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने, त्यांचा वेळ व पैसाही वाचणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com