
पहाटे लवकर उठून स्वतःचं आवरणे आणि त्यानंतर मग गोठा, म्हशी धुणे, दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध डेअरीवर घालणे ही कामे श्रद्धा करते.
अहमदनगर: श्रद्धाचे वडील दिव्यांग, लहान बहीण अश्विनी पुण्यात शिक्षण घेते. लहान भाऊ कार्तिक दहावीत शिकत आहे. त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार श्रद्धा आणि तिच्या आईवर आहे. वडिलांनी तिला लहानपणी कुस्तीचे प्रशिक्षण दिलं. पुढे जाऊन ती ज्युदोपटू बनली. दहावीत असतानाच ती दूध काढायला शिकली. घरी असलेल्या चार म्हशींचा सुरुवातीला श्रद्धाने व्यवस्थापन केलं. हळूहळू तब्बल ऐंशी म्हशींपर्यंत पोहचली आहे. या म्हशींसाठी तिने वडिलांच्या मदतीने घराजवळच म्हशींसाठी दोन मजली गोठा बांधलाय. मजुरांच्या मदतीने ती दुग्धव्यवसाय करते. विशेष म्हणजे सर्व चारा विकत घेऊन तिने हा प्रयोग यशस्वी केलाय.
पहाटे लवकर उठून स्वतःचं आवरणे आणि त्यानंतर मग गोठा, म्हशी धुणे, दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध डेअरीवर घालणे ही कामे श्रद्धा करते. इतकेच नाही तर म्हशींसाठी पेंड किंवा म्हशीचे खाद्य घेऊन येणे आणि म्हशीला खाऊ घालणे ही सर्व कामे करून संध्याकाळी अभ्यास करणे असा श्रद्धाचा दिनक्रम आहे. कॉलेजात गेल्यावर तिला कोणी म्हणणार की ही मुलगी एवढी कष्टाची कामं करते. घरातील बहुतांशी पैशाचे व्यवहार तिच्याचकडे असतात.