
अहिल्यानगर : पलवल (हरियाना) येथे आयोजित १७ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगरच्या शिऊरचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर सुजय नागनाथ तनपुरे याने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी अभिनंदन केले आहे.