esakal | तुम्हाला तनपुरेंच्या वाड्यावर जायचे तर खुशाल जा, विखे पाटलांचा रोख कोणावर

बोलून बातमी शोधा

Sujay Vikhe Patil and Shivaji Kardile together}

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या चुकीच्या बातम्या पसरविल्याचे भाजप तालुकाध्यक्ष भनगडे यांनी सांगितले.

तुम्हाला तनपुरेंच्या वाड्यावर जायचे तर खुशाल जा, विखे पाटलांचा रोख कोणावर
sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : जिल्हा सहकारी बॅंकेची नगर तालुक्‍यात निवडणूक झाल्याने माजी आमदार शिवाजी कर्डिले हिरो ठरले आहेत. राहुरीतील मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वेगळा कौल दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होणे स्वाभाविक आहे; परंतु विखे-कर्डिले भविष्यात एकसंघ राहतील. ज्यांना तनपुरे यांच्या वाड्यावर जायचे, त्यांनी खुशाल जावे. आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीर आहोत. ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्‍यातच शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाबाबत गंभीर तक्रारी आहेत, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

जिल्हा बॅंक निवडणुकीतील विजयाबद्दल कर्डिले यांच्या सत्कार सोहळ्यात डॉ. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब (चाचा) तनपुरे होते. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, उत्तम म्हसे, सुरेश बानकर, विक्रम तांबे, किशोर वने, नानासाहेब गागरे, संचालक रवींद्र म्हसे, सुरसिंग पवार, अर्जुन बाचकर, नंदकुमार डोळस, शिवाजी गाडे, सुभाष गायकवाड उपस्थित होते. 

कर्डिले म्हणाले, ""विधानभवनात मागच्या दाराने प्रवेश करणार नाही. राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढविणार आहे. खासदार डॉ. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नातेवाईक व कार्यकर्त्यांना समजून सांगण्याची गरज आहे. माझ्याशी कोणाचे पटत नसेल, याचा अर्थ विरोधात जाणे योग्य नाही. हा प्रश्न फक्त राहुरीचा नसून, सर्व जिल्ह्याचा आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून तनपुरे साखर कारखाना सुरळीत चालविण्यासाठी मदत केली. यापुढेही करू.'' 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या चुकीच्या बातम्या पसरविल्याचे भाजप तालुकाध्यक्ष भनगडे यांनी सांगितले. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण निधीसाठी कर्डिले यांनी 5 लाख रुपयांची देणगी दिली.