

Sujay Vikhe Patil, Sangamner District Bank,
sakal
संगमनेर, : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेत चुकीचे लोक जाऊ नयेत, यासाठी मी स्वाभिमान बाजूला ठेवला आहे. माझ्या स्वाभिमानापेक्षाही शेतकरी जगला पाहिजे, ही माझी भावना आहे. त्यासाठी कोणाच्याही दारात जायला तयार आहे. त्याचा कमीपणा वाटत नाही, असे मत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमध्ये, पोलिस भरतीमध्ये निवड झालेल्या नांदूर (ता. संगमनेर) येथे विद्यार्थ्यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांच्या वतीने सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात डॉ. विखे बोलत होते. व्यासपीठावर आमदार अमोल खताळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, किशोर डोके, सुभाष आहेर, गुलाब भोसले, प्रमोद राहाणे आदी उपस्थित होते.