नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी "सकाळ"चे प्रा. सुनील गर्जे

Sunil Garje as the President of Nevasa Taluka Press Association
Sunil Garje as the President of Nevasa Taluka Press Association
Updated on

नेवासे : नेवासे तालुका एकता पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे नेवासे तालुका बातमीदार प्रा. सुनील गर्जे, तर कार्याध्यक्षपदी दादासाहेब निकम यांची निवड करण्यात आली आहे.

नेवासे तालुका एकता पत्रकार संघाचे कोअर कमिटीची बैठक गुरुवारी (ता. १) रोजी ज्येष्ठ पत्रकार सुखदेव फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार विनायक दरंदले, बाळासाहेब नवगिरे, सुहास पठाडे, इकबाल शेख, सुधाकर होंडे, दादासाहेब निकम, सोपान भगत, देविदास चौरे यांच्या उपस्थित पार पडली. ज्येष्ठ पत्रकार प्रसाद देशपांडे, अनिल गर्जे, बन्सी एडके आदी ऑनलाईन सहभागी झाले होते.

अध्यक्षपदासाठी प्रा. सुनील गर्जे यांचे नाव विनायक दरंदले यांनी सुचविले. त्याला सोपान भगत यांनी अनुमोदन दिले. तर कार्याध्यक्षपदासाठी दादासाहेब निकम यांचे नाव इकबाल शेख यांनी सुचविले. त्याला सुधाकर होंडे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व कार्याध्यक्षपदाची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

प्रा. सुनील गर्जे  व इतर पदाधिकाऱ्यांची निवड ही  २०२१-२३ या दोन वर्षासाठी करण्यात आली. यावेळी इतर कार्यकारिणी व पदाधिकारी निवडीचे अधिकार नूतन अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना देण्यात आले. बाळासाहेब नवगिरे यांनी आभार मानले.अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com