esakal | विकास कामे आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या संपर्कावर नगरपंचायतीची निवडणूक जिंकू

बोलून बातमी शोधा

Sunil Karjatkar has said that he will win the Nagar Panchayat elections through development works and liaison with local office bearers.jpg}

विकास कामे आणि स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या संपर्कावर नगरपंचायतीची निवडणूक जिंकू, असे प्रतिपादन भाजपचे राज्य निवडणूक प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी केले.

विकास कामे आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या संपर्कावर नगरपंचायतीची निवडणूक जिंकू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत (अहमदनगर) : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत थेट प्रदेश भाजपने लक्ष घातले आहे. विकास कामे आणि स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या संपर्कावर नगरपंचायतीची निवडणूक जिंकू, असे प्रतिपादन भाजपचे राज्य निवडणूक प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी केले.

येथील नगरपंचायत निवडणूक पूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा.राम शिंदे होते तर उत्तर महाराष्ट्र प्रमुख रवींद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा बँक संचालक अंबादास पिसाळ, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, नगराध्यक्ष प्रतिभा भैलूमे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख सचीन पोटरे, अशोक खेडकर, शांतीलाल कोपनर, वैभव शहा, सुनील यादव, अल्लाउद्दीन काझी, रमेश झरकर, स्वप्नील देसाई, विनोद दळवी, दादा सोंनमाळी, रामदास हजारे, अनिल गदादे, अमृत काळदाते, अनिल भोज आणि नगरसेविका नीता कचरे, राणी गदादे, उषा मेहेत्रे, राखी शहा, मनीषा वडे, डॉ कांचन खेत्रे, आशा वाघ यावेळी उपस्थित होत्या.

ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नातून झालेला विकास, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रभावीपणे राबविलेल्या केंद्राच्या सार्वजनिक विकास आणि वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संपर्कावर नगरपंचायतची आगामी निवडणूक जिंकू. 

प्रा.राम शिंदे म्हणाले, आगामी नगरपंचायत निवडणुकीत कर्जतमधील सुज्ञ मतदार परकीय टोळधाड परतवून लावतील. निवडणुकीत यश मिळेल. तसेच प्रभाग निहाय सर्व्हे नुसार उमेदवार दिले जातील.या वेळी रवींद्र अनासपुरे यांनी बूथ रचना आणि प्रभागनिहाय संघटना त्मक बांधणीची माहिती दिली.प्रास्ताविक नामदेव राऊत यांनी केले तर सूत्रसंचालन सचीन पोटरे यांनी केले,शेवटी आभार वृषाली पाटील यांनी मानले.

या बैठकीला भाजपचे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे गट तट संपून नगरपंचायत निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचे संकेत यातून मिळाले.