JCB Theft Gang Arrested
sakal
पारनेर - सुपा येथील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपाच्या पार्किंगमधून जेसीबी चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० लाख रुपयांचा जेसीबी आणि १३ लाखांची क्रेटा कार असा एकूण ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.