
पारनेर : सुपे येथील जुन्या एमआयडीसीमध्ये वापरलेल्या टायरपासून ऑइल बनविणाऱ्या व्हीजी कार्बन कंपनीस मोठी भीषण आग लागल्याने कंपनीमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे टायर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या वेळी तीन अग्निशामक दलाच्या जवानांनी तब्बल तीन तासांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.