

टाकळी ढोकेश्वरः पारनेर तालुक्यातील एका शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षकाने १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करत मारहाण केली. या प्रकरणी पर्यवेक्षक साहेबराव जराड (पूर्ण नाव माहीत नाही, रा. हिवरे कोरडा, ता. पारनेर) यांच्या विरोधात रविवारी (ता. १६) रात्री १० वाजता पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.