हनुमान टाकळीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक

सुर्यकांत वरखड
Saturday, 18 July 2020

पाथर्डी तालुक्‍यातील हनुमान टाकळी येथे दरोडा घालून प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अंतापूर (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथून सात जणांच्या मुसक्‍या आवळल्या.

नगर : पाथर्डी तालुक्‍यातील हनुमान टाकळी येथे दरोडा घालून प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अंतापूर (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथून सात जणांच्या मुसक्‍या आवळल्या.

दगडू मुबारक ऊर्फ आण्णा भोसले (वय 23), दर्या बरांड्या भोसले (वय 21), गुंड्या डिस्चार्ज काळे (वय 19), आकाश उर्फ टाकसाहेब छगन काळे (वय 19), विशाल दारसिग भोसले (वय 19, सर्व रा. अंतापूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), कुलत्या बंड्या भोसले (वय 20, रा. बाभरगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), आवान भुर्रम काळे (वय 22), आवान भूर्रम काळे (वय 22, रा. हात्रळ, ता. पाथर्डी) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. 

पाथर्डी तालुक्‍यात 14 जुलैला रात्री हनुमान टाकळी येथील आसाराम पांडुरंग घुले यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. घुले याच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले आणि घुले यांना शस्त्राचा धाक दाखवून दगडफेक केली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा गंगापूर तालुक्‍यातील अंतापूर येथील टोळीने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अंतापूर येथे सापळा लावून संशयीतु आरोपींना पकडले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तितास खंडू काळे, बेग महादू भोसले, रवी अण्णा भोसले, बॉबी संतोष काळे यांच्या साथीने गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या. आरोपींना तपासाकामी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspects arrested in Hanuman Takli robbery case in Pathardi taluka