
श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासी महिलेच्या प्रसूतिसाठी झालेली अवहेलना ही आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांना निलंबित करा, अशी आग्रही मागणी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आमदार ओगले यांनी केली.