Ahilyanagar ZP School Event : तहसीलदारांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत; राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उपक्रम
Tehsildar Welcomes Students at ZP School : निरागस, गोंडस, काही हसतमुख, तर काही रडवलेले चेहरे घेऊन शिक्षणाच्या श्री गणेशासाठी आलेल्या चिमुरड्यांचे गुलाबपुष्प, पुस्तके व खाऊ देऊन तहसीलदार बिराजदार यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थी व पालकांसोबत संवाद साधला.
Tehsildar Joins ZP School Students’ Welcome in Ahilyanagaresakal
राशीन : तहसीलदार गुरू बिराजदार यांनी राशीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जातीने उपस्थित राहत पालक अन् शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.