
पारनेर : जमिनीची वारस नोंद लावण्यासाठी पाडळी आळे येथील कामगार तलाठी आशीर्वाद प्रभाकर घोरपडे (रा.पाईपलाईन रोड, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) यांनी तक्रारदार यांचेकडून तीन हजार रूपयांची लाच घेताना पकडले. त्याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.