
अहिल्यानगर : खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा सावरगावतळ (ता. संगमनेर) येथील तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. मुजीब अब्दुलरब शेख (वय ५१, रा. नवीपेठ कर्जत, तत्कालीन नेमणूक हळगाव, ता. जामखेड, सध्या नेमणूक सावरगावतळ, ता. संगमनेर) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.