रात्री उशिरापर्यंत संगणकावर काम करून दिवसा खातेदारांशी होणाऱ्या वादामुळे तलाठी मानसिक तणावात

विलास कुलकर्णी
Saturday, 7 November 2020

तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना तसे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की कार्यालयीन वेळेत सकाळी साडेअकरा ते सायंकाळी पाचदरम्यान सर्व्हर डाऊन असतो. शेतकऱ्यांना सात-बारा उतारे देणे, फेरफारसंबंधी कामकाज करणे यामुळे शक्‍य होत नाही.

राहुरी (नगर) : राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाचे कामकाज ऑनलाइन झाले. त्यासाठी असलेल्या डीआयएलआरएमपी सर्व्हरचा वेग मंदावला आहे.

मागील तीन महिन्यांपासून बहुतांश वेळा सर्व्हर बंद असतो. सात-बारा उतारे ई-फेरफार यांच्या ऑनलाइन नोंदी होत नाहीत. कामकाज वारंवार ठप्प होते. त्यामुळे शेतकरी, खातेदारांशी वाद होत आहेत. सर्व्हरची क्षमता व वेग वाढवावा, अन्यथा कार्यालयीन वेळेनंतर कामकाज केले जाणार नाही, असा इशारा तलाठी व मंडलाधिकारी संघटनेने दिला आहे.
 
तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना तसे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की कार्यालयीन वेळेत सकाळी साडेअकरा ते सायंकाळी पाचदरम्यान सर्व्हर डाऊन असतो. शेतकऱ्यांना सात-बारा उतारे देणे, फेरफारसंबंधी कामकाज करणे यामुळे शक्‍य होत नाही.

नोंदींचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत आहे. तसे खातेदारांना सांगितले तर ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यामुळे तलाठी व खातेदार यांच्यात वारंवार वाद होतात. रात्री उशिरा सर्व्हर सुरू झाला, तरी वेग नसल्याने कामकाज उरकत नाही. 

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi is in a state of mental stress due to a dispute with the account holders during the day working on the computer till late at night in Rahuri