
-हरिभाऊ दिघे
तळेगाव दिघे : येथील ग्रामपंचायतीने स्थानिक पाणीपुरवठा योजना राबवून ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे तळेगाव दिघे गाव पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण बनले आहे. ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.