esakal | राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या तालुका कार्यकारिणी बेकायदेशीर 
sakal

बोलून बातमी शोधा

The taluka executive of the state primary teachers' committee is illegal

राज्याने वेळोवेळी मागणी आणि सूचना करूनही हिशोब अद्याप पूर्ण केलेला नाही. त्यामुळे राज्याने जिल्ह्यातील सर्व कार्कारणी निवडण्यास, 22 मार्च 2018 च्या परिपत्रकानुसार अधिवेशन हिशोब पूर्ण केल्यानंतर आणि जिल्हा समन्वय साधल्यानंतरच कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या तालुका कार्यकारिणी बेकायदेशीर 

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः जिल्ह्यात सध्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या अहमदनगर शाखेत तालुका पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन निवडीचा बेकायदेशीर सावळागोंधळ चालू आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्यालयीन सरचिटणीस शिवाजी दुशिंग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये तसा आरोप केला आहे. 
प्रसिध्दीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 2018 च्या पत्रानुसार राज्याच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा झाल्यानुसार रोहा आणि महाबळेश्वर येथील अधिवेशनाचा हिशोब तत्कालीन जिल्हाध्यक्ष यांनी राज्याला दिलेला नाही.

राज्याने वेळोवेळी मागणी आणि सूचना करूनही हिशोब अद्याप पूर्ण केलेला नाही. त्यामुळे राज्याने जिल्ह्यातील सर्व कार्कारणी निवडण्यास, 22 मार्च 2018 च्या परिपत्रकानुसार अधिवेशन हिशोब पूर्ण केल्यानंतर आणि जिल्हा समन्वय साधल्यानंतरच कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - मोठी बातमी - सदाशिव लोखंडे यांची फॅमिलीच कोरोना बाधित

संघटना लोकाभिमुख होण्यासाठी कार्यकारणीतील सर्वांना विश्वासात घेऊन निवड होणे अपेक्षित आहे. परंतु या तथाकथीत ऑनलाइन निवडीत केवळ 10 ते 12 जण सहभाग घेऊन निवडलेली कार्यकारणी सर्वसमावेशक होऊ शकत नाही. त्यामुळे कोरोना संकट दूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यकर्ता मेळावा घेऊनच कार्यकारीणी निवडाव्यात. तशा सूचना राज्य कार्यकारिणीने दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत. मात्रस तरीही जिल्ह्यामध्ये आपल्या मर्जीनुसार कार्यकारणी निवडून सामान्य कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात आहे. ती तात्काळ थांबविण्यात यावी असे राज्याकडून निर्देशित करण्यात आले आहे. 

संपादन -  अशोक निंबाळकर
 

loading image
go to top