
अकोले : अकोल्यातील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी प्राध्यापकावर अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासीन गुलाबभाई सय्यद (रा. नवलेवाडी, अकोले) असे या प्राध्यापकाचे नाव आहे. दरम्यान, पीडित विद्यार्थिनीला धमकावल्या प्रकरणी प्राध्यापकाची पत्नी दिलशाद यासीन सय्यद हिच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.