आनंदाची बातमी सांगण्यासाठी शिक्षक गेले डोंगरावर अजयला शोधत

शांताराम काळे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

घरची परिस्थिती म्हणजे जेमतेम त्यात कोरोना त्यामुळे शेतीला मजूर मिळणे अशक्य आश्रमशाळेला सुट्ट्या लागल्याने बलठन तालुका अकोले येथील आदिवासी विध्यार्थी अजय शिंदे याने आपल्या आई- वडिलांना मदत व्हावी म्हणून गुरे चारने, शेतीत गाळ तुडवणी, आवणी इत्यादी कामे सुरू केली होती.

अकोले  (अहमदनगर) : घरची परिस्थिती म्हणजे जेमतेम त्यात कोरोना त्यामुळे शेतीला मजूर मिळणे अशक्य आश्रमशाळेला सुट्ट्या लागल्याने बलठन तालुका अकोले येथील आदिवासी विध्यार्थी अजय शिंदे याने आपल्या आई- वडिलांना मदत व्हावी म्हणून गुरे चारने, शेतीत गाळ तुडवणी, आवणी इत्यादी कामे सुरू केली होती.

दहावीची परीक्षा दिली मात्र निकाल कधी लागणार याचा त्यासला मागमूस नव्हता अचानक मवेशी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिवराज कदम अजयच्या घरी आले. त्यांनी अजयच्या आईस अजय कुठे आहे. विचारताच आई म्हणाली काही शाळेत घडले का? मला सांगा त्यावर सर म्हणाले, अजय कुठे ते सांगा आईने तो गुरे चारायला डोंगरावर गेलाय असे उत्तर दिले. त्यावर सरांनी आईला घेऊन तो गुरे चारत होता. त्याठिकाणी आपला मोर्चा वळविला. त्यांच्यासोबत सहकारी शिक्षक ही होते.

अजयने त्यांना पाहिल्यावर सर आले म्हणूंन डोंगरावरून खाली येत सर का आले, असे म्हणताच कदम यांनी त्याला मिठी मारून अजय तू प्रकल्पात पहिला आला. तुला 92.2 टक्के मार्क मिळाले ते ऐकून अजयला आनंद झाला व आपल्या गरिबीची काळी किनारही दिसली. त्याला अश्रू आवरता आले नाही. सर मी यापुढे खुप अभ्यास करून अधिकारी होऊन माझ्या आई- वडिलांचे दुःख हलके करील. हे ऐकून वडील भाऊ व आई मीराबाई यांनाही अश्रू आवरता आले नाही. १५ वर्षच्या या मुलाला ही समज गरिबीतूनच आल्याचे दिसून आले.

जिद्दी व चिकाटी अजय भविष्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू लागला आहे. तर माझा सत्कार करण्याऐवजी माझ्या आईवडिलांचा सत्कार करा, असे अजय म्हणाला. मात्र कदम यांनी आई- वडील व अजयचंही सत्कार करून पुढच्या वाटचालीस त्याला शुभेच्छा दिल्या. गावच्या सरपंच विमलबाई बाँबळे यांनी याबकुटुंबाचा सत्कार केला. दिल्या गावच्या सरपंच विमलबाई बाँबळे यांनी या कुटुंबाचा सत्कार केला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The teacher went to the hill to find Ajay Shinde from Akole taluka