esakal | शेवगावच्या तहसीलदारबाई निघाल्या पांदीतून...
sakal

बोलून बातमी शोधा

amrapur

गरडवस्ती - गरवाडी ते ढोरजळगावने या शेती जमिनीतील वहिवाट रस्त्यासाठी बबन कारभारी गरड व इतर ११ जणांनी तहसिलदार भाकड यांच्याकडे दाद मागितली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व शेतात पिके असल्याने शेतक-यांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे त्याची तातडीने दखल घेत तहसिलदार भाकड मंगळवारी  प्रत्यक्ष पाहणीसाठी त्या परिसरात गेल्या. मात्र रस्त्यातील चिखल व पाणी यामुळे त्यांचे वाहन जावू शकले नाही. त्यामुळे त्यांनी माघार न घेता बैलगाडीचा वापर करुन रस्त्याची पाहणी केली.

शेवगावच्या तहसीलदारबाई निघाल्या पांदीतून...

sakal_logo
By
राजू घुगरे

अमरापूर (नगर) : ढोरजळगाव परीसरातील पावसामुळे पाणी साचून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी व शेतशिवारातील वहिवाट रस्त्याच्या पाहणीसाठी शेवगावच्या तहसिलदार अर्चना भाकड - पागिरे यांनी थेट बैलगाडीने प्रवास करत शेतक-यांचा बांध गाठला. पावसामुळे परीसरातील रस्ते व शेती जलमय झाली असून पाहणीसाठी कुटल्याही वाहने जात नसल्याने प्रवासासाठी निवडलेल्या बैलगाडीच्या पर्यायाने तो चर्चेचा विषय ठरला. 

गरडवस्ती - गरवाडी ते ढोरजळगावने या शेती जमिनीतील वहिवाट रस्त्यासाठी बबन कारभारी गरड व इतर ११ जणांनी तहसिलदार भाकड यांच्याकडे दाद मागितली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व शेतात पिके असल्याने शेतक-यांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे त्याची तातडीने दखल घेत तहसिलदार भाकड मंगळवारी  प्रत्यक्ष पाहणीसाठी त्या परिसरात गेल्या. मात्र रस्त्यातील चिखल व पाणी यामुळे त्यांचे वाहन जावू शकले नाही. त्यामुळे त्यांनी माघार न घेता बैलगाडीचा वापर करुन रस्त्याची पाहणी केली.

यावेळी त्यांनी चार वेगवेगळ्या वहीवाट रस्त्यांची पाहणी केली. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी, तुर, मुग, सोयाबीन या पिकांची पाहणी केली. यावेळी तहसिल कार्यालयातील अव्वल कारकुण श्रीकांत गोरे, तलाठी सोनल गोलवड, मंडलाधिकारी आर.ई. सावंत आदींसह शेतकरी उपस्थित होते.

शेवगावच्या तहसिलदार अर्चना भाकड म्हणाल्या, पावसामुळे शेतक-यांना शेतात जाण्यासाठी सध्या रस्त्याची मोठी अडचण भासत आहे. मात्र शेतक-यांनी वाद न करता सामोपचाराने प्रशासनाकडे दाद मागावी. आपण तालुक्यातील प्रलंबीत असलेल्या वहिवाट व शिवरस्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 

संपादन - सुस्मिता वडतिले    

loading image