मुंबई, नाशिकमधून आलेल्या पर्यटकांना लावला जाणार दहा हजाराचा दंड

शांताराम काळे
Friday, 25 September 2020

पर्यटनाबाबत सरकारने अटी शिथिल केल्यामुळे मोठ्याप्रमाणात पट्टा किल्ला येथे पर्यटक येत आहेत.

अकोले (अहमदनगर) : पर्यटनाबाबत सरकारने अटी शिथिल केल्यामुळे मोठ्याप्रमाणात पट्टा किल्ला येथे पर्यटक येत आहेत. त्याचा वन कर्मचारी व स्थानिकांना त्रास होऊ लागल्याने तिरढा ग्रामपंचायतने ठराव घेऊन गडावर येणाऱ्या पर्यटकांना मोठा दंड आकारण्याचा इशारा घेतला आहे. त्यामुळे या भागात कुणीही येऊ नये,  असे सरपंच मंदा सचिन गोडे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. 

पट्टा किल्ला उपनाव- विश्रामगड तालुका- अकोले जिल्हा- अहमदनगर उंची- 1391 मीटर पायथ्याची गावे- पूर्वेला पट्टावाडी, दक्षिणेला कोकणगाव तर उत्तरेला तिरडे गाव गाडीमार्ग-  नाशिक- घोटी- टाकेद-म्हैसवळण घाट- पट्टावाडी चढाई श्रेणी- सहज व सोपी वेळ- संपूर्ण किल्ला भटकंतीसाठी 3 ते 4 तास लागतात.. या गडावर नाशिक, नगर, औरंग्बाद, संगमनेर, मुंबई या भागातून पर्यटक येतात. निवांत ठिकाण असल्याने कोरोना असतानाही व या भागात मद्यपी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.  वन कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांना दमदाटी करून गडावर जातात. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सरपंच गोडे यांनी सांगितले. 

कोरोनामुळे गावावर कोणतेही संकट येऊ नये. म्हणून ग्रामस्थ सतर्क असून बळजबरीने आल्यास 10 हजारपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याचे ते म्हणाल्या.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten thousand fine will be imposed on tourists in Akole taluka