दहावी-बारावीच्या पेपर्सची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग; प्रश्नपत्रिका भस्मसात

चंदनापुरी घाटातील घटना; दहावी-बारावीच्या पेपरच्या टेंपोस आग
tenth twelfth board question paper burned fire on the transport tempo
tenth twelfth board question paper burned fire on the transport temposakal
Updated on

संगमनेर : संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटातून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका टेम्पोला आग लागून, त्यात टेम्पोसह आतील दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी चार मार्चपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची मध्य प्रदेशातील भोपाळ येथे छपाई करून, त्या पुणे येथील बोर्डाच्या कार्यालयात पोच करण्यासाठी टेम्पोमधून (एमपी 36 एच 0795) नेल्या जात होत्या. या वाहनात चालक मनोज चौरसियासोबत छपाई कंपनीचा व्यवस्थापक रामविलास रजपूत होते. पहाटे नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटातील हॉटेल साईप्रसादसमोर पाठीमागील बाजूने आग लागल्याचे लक्षात आले. चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून आग विझविण्याचे प्रयत्न केले.

दरम्यान, ही माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे व त्यांचे सहकारी, घारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील, तसेच संगमनेर साखर कारखाना व नगरपरिषदेचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्याने थोड्या वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात जळिताची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com