esakal | पूल कोसळल्याने दोन गावांचा संपर्क तुटला
sakal

बोलून बातमी शोधा

पूल कोसळला

पूल कोसळल्याने दोन गावांचा संपर्क तुटला

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी ( जि. अहमदनगर) : मानोरी-केंदळ या दोन गावांना जोडणाऱ्या, मुळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याशेजारील पूल कोसळला. त्यामुळे मानोरी, केंदळ, चंडकापूर या तीन गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा: नेवाशात प्रकरणे मंजुरीसाठी पैशांची मागणी; झेडपी सदस्याकडून भांडाफोड

मानोरी बंधाऱ्याशेजारील पूल जीर्ण होऊनही त्यावरून वाहतूक सुरू होती. काल (सोमवारी) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ओढे-नाले वाहू लागले. या पाण्याने पूल अखेर कोसळला. यामुळे मानोरी, केंदळ, चंडकापूर गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी केंदळ व मानोरीच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

हेही वाचा: तनपुरे कारखान्याच्या सहा आंदोलक कामगारांना अटक आणि सुटका

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे माजी खासदार प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा करून, २२ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे काम वेगाने सुरू करावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, सरपंच अब्बास शेख, नवनाथ थोरात, गोकुळ आढाव, उत्तम खुळे, बबनराव साळुंखे, वैभव पवार, किशोर जाधव, निवृत्ती आढाव डॉ. राजेंद्र पोटे, पोपट पोटे, श्यामराव आढाव, संभूगिरी गोसावी, बाबासाहेब आढाव, अण्णासाहेब तोडमल यांनी केली आहे.

loading image
go to top