सुटला पेच पण लागली ठेच, कुकडीचे आवर्तन येईल लवकरच

कुकडी प्रकल्पाच्या पट्ट्यातील आमदारांची झाली बैठक
कुकडी आवर्तन बैठक
कुकडी आवर्तन बैठकई सकाळ

श्रीगोंदे : - कुकडीच्या आवर्तनामुळे नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना चांगलीच ठेच लागली आहे. यापुढे असे अडथळे येणार नाही, याची तजवीज त्यांना करावी लागेल. नाही तर पुणे जिल्ह्यातील नेते आणि शेतकऱ्यांची पुन्हा दादागिरी सहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या (kukadi canal) आवर्तनाला स्थगिती दिल्याने आवर्तनाबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला होता. आज ( ता. ११) मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. यात चर्चेतून सकारात्मक मार्ग निघाल्याने कुकडीच्या आवर्तनचा विषय मार्गी लागल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते (babanrao pachpute) यांनी दिली.(The cycle from Kukdi canal will soon be over)

कुकडी आवर्तन बैठक
अजितदादांना लागली नीलेश लंकेंच्या आरोग्याची काळजी

पाचपुते म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आपण स्वतः, आमदार रोहित पवार (rohit pawar), आमदार अतुल बेनके (Atul benake) उपस्थित होते. यावेळी असणारी गरज, पाणी नाही मिळाले तर शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान आदी बाबी जयंत पाटील यांच्यासमोर मांडल्या. कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडावेच लागेल ही स्पष्ट भूमिका घेतली. ज्या याचिकेमुळे या विषय लांबला. त्या याचिकाकर्त्यांना आमदार बेनके यांनी फोन केला. जयंत पाटील स्वतः त्यांच्याशी बोलले.

पिंपळगाव जोगे धरणासाठी २५ कोटींचा निधी वापरून डेडस्टॉकचे पाणी वापरात आणले जाईल. पाण्याचा कायमचाच प्रश्न मार्गी लागेल. हा कुकडी प्रकल्पातील सर्वांचाच मोठा फायदा आहे. आपण सहकार्याची भूमिका घ्यावी, असे याचिककर्त्यांसस आश्वसित केले. त्यामुळे न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली. न्यायालयाचा निकालही सकारात्मक असेल, कुकडीचे आवर्तन तातडीने सुटून सर्वांना पाणी मिळेल, अशी माहिती पाचपुते यांनी दिली.

डिंभे-माणिकडोह बोगद्याचा निर्णय लवकरच

पाचपुते म्हणाले, डिंभे ते माणिकडोह बोगदा हा कुकडी प्रकल्पासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. हा बोगदा झाला तर एक आवर्तनाएवढे वाया जाणारे पाणी सहज उपलब्ध होऊन सर्वांनाच न्याय मिळेल. या बाबत जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात आज चर्चा झाली. अशीच एक बैठक घेऊन तो विषय सर्वांना एकत्र बसून मार्गी लागेल, त्यामुळे कुकडी चा मोठा प्रश्न सुटून पाण्याची कमतरता कधीच जाणवणार नाही.(The cycle from Kukdi canal will soon be over)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com