कोविड सेंटरमध्येच शुभमंगल! रूखवतात पीपीई किट, सॅनिटायझर

कोविड सेंटरमध्येच शुभमंगल! रूखवतात पीपीई किट, सॅनिटायझर

पारनेर (अहमदनगर) ः विवाह समारंभातील अनेक अनिष्ट चाली-रितींना फाटा देत दोन तरूण कोविड सेंटरमध्येच विवाहबद्ध झाले. इतकेच नव्हे तर वधू-वर पित्याने नववधू-वरांना देण्यात येणा-या रूखवतात भांडी, कपाट, फ्रीज, पलंग व टीव्हीऐवजी रूखवतात दिले मास्क, सॅनिटयझर, पीपीई कीट व औषधांचे बॉक्स. हा सर्व औषधांचा रूखवत कोविड सेंटरला भेट देण्यात आला.

आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार कोविड सेंटरमध्ये चौघेजण विवाहबद्ध झाले. कोरोना सेंटरमध्ये विवाह करण्याची ही राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलीच घटना असावी. या जोडप्यांनी कोविड संदर्भातील सर्व नियमांचे काटोकोरपणे पालन करत आपला विवाह सोहळा मोजक्या व-हाडी मंडळीत उरकला. आहेर म्हणून कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणात औषधे व इतर साहित्य देऊन एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. (The four were married at the Covid Center in Bhalwani)

कोविड सेंटरमध्येच शुभमंगल! रूखवतात पीपीई किट, सॅनिटायझर
हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरूंची संख्या दीडपट वाढली

आता या आगळ्या-वेगळ्या विवाहाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. विवाह सोहळा साध्या पद्धतीने व अल्प खर्चात पार पडल्याने विवाच्या खर्चाच्या बचतीतून शिल्लक राहिलेली रक्कम कोविड सेंटरला मदत म्हणून देण्यात आली.

आमदार लंके यांच्याकडे या तरूणांनी काही दिवसांपासून आम्हाला कोविड सेंटरमध्ये विवाह करावयाचा आहे, असा आग्रह धरला होता. करोना आजार हा संसर्गजन्य आहे. मात्र, या आजाराविषयी जनतेत मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. कोरोनाबाधित व मुक्त व्यक्तींकडे तसेच त्यांच्या कुटुंबियांकडे तुच्छतेने पहाण्याची एक वेगळी भावना झाली आहे. त्यामुळे या आजाराला बळी पडलेल्या रूग्णास तसेच त्यांच्या कुटुंबांस मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

लग्नानंतर भावना व्यक्त करताना नवदाम्पत्य.
लग्नानंतर भावना व्यक्त करताना नवदाम्पत्य.

समाजाचा हा दृष्टिकोन बदलण्यासाठी, कोरोनाविषयी असणारी भीती व गैरसमज दूर करण्यासाठी करोना सेंटरमध्ये विवाह पार पाडण्याचा निर्णय घेतला असल्याचे अनिकेत व्यवहारे व आरती शिंदे तसेच जनार्दन कदम व राजश्री काळे या उच्चशिक्षित वधू-वरांनी सांगितले.

वधू-वरांचाच हट्ट

वधू-वरांचा हट्ट पुरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीतीत विवाह पाडण्याच्या व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना वधू-वरांच्या कुटुंबियांना देण्यात आल्या. वधू-वरांसह उपस्थितांच्या करोना तपासण्या करण्यात आल्या. विवाह स्थळाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. विवाह सोहळा पार पडल्यानंतर व-हाडासह रूग्णांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.

या वेळी आमदार लंके यांच्यासह अॅड. राहुल झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, बाळासाहेब खिलारी, राजेंद्र चौधरी, अशोक घुले, श्रीकांत चौरे, डॉ. सुनील गंधे ,बंडू कुलकर्णी, दत्ता कोरडे, प्रमोद गोडसे, संदीप चौधरी, सत्यम निमसे, देवराम व्यवहारे, सुदाम शिंदे, रामभाऊ रासकर, लहू व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

मलाही आश्चर्य वाटले

उच्चशिक्षित वधू वरांनी सामाजिक भावनेतून कोविड सेंटरमध्ये विवाह केल्यामुळे करोना आजाराविषयीची भिती व गैरसमज दूर होण्यास मदत होईल. प्रथम वधू-वरांच्या मित्रांनी विवाह सोहळा करण्याची परवानगी मागितली. त्यावेळी मला आर्श्चय वाटले. द्विधा मनस्थिती परवानगी दिली. जगाला कोरोना आजाराने हैराण केले असताना कोविड सेंटरमध्ये विवाह करण्याचा ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेणाऱ्या या नववधू-वरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

-नीलेश लंके, आमदार.

(The four were married at the Covid Center in Bhalwani)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com