
अहिल्यानगर : नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केल्याने गेल्या ३६ महिन्यांपासून ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बँकेत अडकल्या आहेत. ठेवीदारांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या आदेशाने ठेवी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात कधी पैसे मिळतात, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.