esakal | तेलाचे भाव कडाडल्याने कॉमन मॅनचे मोडले कंबरडे
sakal

बोलून बातमी शोधा

oil

तेलाचे भाव कडाडल्याने कॉमन मॅनचे मोडले कंबरडे

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर : कोरोनाने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकाडाउनमुळे रोजगार गेले आहेत. बहुतेकांना कामधंद्यासाठी बाहेर पडता येत नाही. गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. तेलाच्या किमतीत यंदा विक्रमी 80 ते 90 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. सोयाबीन व शेंगदाणा तेल 160 रुपये व सूर्यफूल तेल 175 रुपये प्रतिकिलोवर पोचले आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. (The plight of the common man due to rising oil prices)

सूर्यफूल, करडई तेलाच्या भावात वाढ झाल्याने बहुतांश ग्राहक सोयाबीन किंवा पामतेलाला पसंती देत आहेत. कोरोना संकटात खाद्यतेलासह इतर वस्तूंचे दर झपाट्याने वाढल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा: ढील दिली, महागात पडली! पुन्हा नगर शहरात कडक लॉकडाउन

तेलबियांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. खाद्यतेलाचे भाव वाढण्याचे मुख्य कारण कोरोनासह पाम तेलावरील आयात शुल्कात झालेली वाढ व शेंगदाण्याची निर्यात, हे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

येथील तेल व्यावसायिक मुकेश ज्ञानी म्हणाले, ""सूर्यफूल, करडई तेलाचे दर वाढल्याने ग्राहक पाम तेलाच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. पॅकिंग व सुट्या खाद्यतेलाच्या दरात थोडीफार तफावत आहे. बाजारातून सरकी तेल गायब झाले असून, दिवाळीनंतर नवीन सरकी बाजारात येईल. तोपर्यंत तेलाचे दर चढेच राहणार आहेत.

खाद्यतेलाचे दर- (लिटरमध्ये)

सोयाबीन तेल - 160 रुपये

पाम तेल - 150

शेंगदाणा तेल - 160

सूर्यफूल तेल - 175

करडई तेल - 175

मोहरी तेल - 165

(The plight of the common man due to rising oil prices)