Ahmednagar news : पोलिसांना मिळणार लवकरच घरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

b.g. shekhar
Ahmednagar news : पोलिसांना मिळणार लवकरच घरे

अहमदनगर : पोलिसांना मिळणार लवकरच घरे

नेवासे : नेवासे पोलिस ठाण्याची सध्याची जागा खूपच अपुरी आहे. प्रस्तावित जागा पोलिस विभागाच्या नावावर नसल्याने काही अडचणी आल्या होत्या. मात्र, या जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे. या जागेबाबत जिल्हाधिकारी(collector suraj mandhre) व जिल्हा पोलिसअधीक्षक (sp manoj patil)यांच्यात चर्चा झाली आहे. वर्षभरात नेवासे पोलिस ठाणे, अधिकारी व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न माझ्याच कार्यकाळात मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी जी. शेखर यांनी केले.

शेखर यांनी शुक्रवारी (ता. १४) नेवासे पोलिस ठाण्यात वार्षिक तपासणी केली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. त्यांच्या समवेत पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्यासह नेवासे पोलिस ठाण्याचे पोलिस बाजीराव पोवार उपस्थित होते.

हेही वाचा: अहमदनगर : शहरातील बंगाली चौक रस्त्यावर खून

शेखर व त्यांचे पथक आज सकाळी अकराच्या सुमारास नेवासे पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलिस ठाण्यातील विविध गुन्ह्यांची दप्तरतपासणी करीत आढावा घेतला. दरम्यान, त्यांनी पोलिस ठाण्यासह उपकारागृहाची पाहणी केली. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर तपासणीसाठी नेवासे येथे येणार असल्याने, गेल्या दीड महिन्यापासूनच पोलिस ठाण्याची रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्यात आले. ते पाहून उपमहानिरीक्षकांनी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, नितीन पाटील त्यांच्यासह पोलिस कर्मचाऱयांचे कौतुक केले.

हेही वाचा: अहमदनगर : शेतकऱ्याचा खून करणाऱ्या दोघा भावांना जन्मठेप

शेखर यांच्याकडून पैस खांबाचे दर्शन

नेवासे पोलिस ठाण्याच्या(newase police station) वार्षिक तपासणीसाठी आलेले पोलिस उपमहानिरीक्षक बी जी. शेखर (Deputy Inspector General of Police B.G. Shekhar)यांनी आज नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरास भेट देत पैस खांबाचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील(sp manoj patil) होते. यावेळी मंदिर संस्थानचे मुख्य विश्वस्त गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले व ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top