‘कुकडी’चे आवर्तन अखेर लांबलेच...; लाभ क्षेत्रातील खासदार-आमदारांच्या मौनाने शेतकरी हवालदिल

Kukadi
Kukadi

श्रीगोंदे : आजपासून सुरु होणारे कुकडीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन पुणे जिल्ह्यातील नेते व शेतकऱ्यांच्या विरोधाने लांबले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत २२ मे पासून आवर्तन सोडण्यास संमती देणाऱ्या काही लोकप्रतिनिधींसह धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांचा विरोध पुन्हा अहमदनगर व करमाळाकरांसाठी अडचणीचा ठरतो की काय? अशी भिती आहे. या सगळ्यात खासदार, सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांचे मौन मात्र चक्रावणारे आहे.

Kukadi
विक्रमगड : विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नव्हता पूल, ग्रामस्थांनी बांधला बांबूचा पूल

कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक ९ मे रोजी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तीत पिंपळगावजोगे धरणातील अचल साठा व इतर धरणातील उपयुक्त पाणी घेवून येडगाव धरणातून कुकडीच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत चर्चा झाली.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व राम शिंदे यांनी हे आवर्तन तातडीने सोडण्याची आग्रही मागणी केली. आमदार अतुल बेनके यांनी पिंपळगावजोगे तील तीन टीएमसी अचल साठा काढण्यास विरोध केला. डाव्या कालव्याचे आवर्तन तातडीने न सोडता ३० मे रोजी सोडावे, असा अभिप्राय दिला. मध्यमार्ग काढताना २२ मे रोजी हे आवर्तन सुरु करण्याचा समंतीने निर्णय झाला.

या बैठकीतील निर्णयानूसार ३० दिवसांचे आवर्तन करतानाच करमाळा ७ दिवस, कर्जत ८ दिवस, श्रीगोंदे ६ दिवस, पारनेर २ दिवस व पाणी पोच कालावधी ७ दिवस असा ३० दिवसांचा आवर्तन कार्यक्रम आखण्यात आला. त्यासाठी ३. ६३६ टीएमसी पाणी वापरण्याचे ठरविण्यात आले.

Kukadi
Rohit Pawar : फेरमतमोजणीत भाजप तोंडघशी; कर्जतमध्ये सभापतीपदाचा पेच कायम

आज पाणी सोडणे अपेक्षीत होते मात्र पुणे जिल्ह्यातील काही नेत्यांसह शेतकऱ्यांनी आवर्तनाला विरोध केल्याने आजचे आवर्तन लांबले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान २५ मे रोजी त्या शेतकरी व नेत्यांशी चर्चा होवून त्यानंतर आवर्तनाबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आज तरी आवर्तनाचा निर्णय तळ्यात मळ्यातच आहे.

त्यातच १ जून पासून खरीप हंगाम सुरु होणार असल्याने तोपर्यंत जर आवर्तन सोडले नाही तर मग खरीप हंगामात प्रकल्पात ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा असला तरच आवर्तन सोडता येते असा नियम आहे. आज प्रकल्पात केवळ १२ टक्केच असे पाणी असेल तरी हा निर्णय उन्हाळी हंगामासाठी असल्याने अडचण नाही.

पुणे जिल्ह्यातील नेते व शेतकरी आवर्तनाला विरोध करीत असतानाही खासदार सुजय विखे पाटील, सत्ताधारी आमदार राम शिंदे व बबनराव पाचपुते यांच्यासह विरोधी आमदारही काहीच बोलत नसल्याचे दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा राज्य सरकारपर्यंत कशी जाणार या विवंचनेत लाभार्थी आहेत.

"आजचे आवर्तन लांबले असले तरी दोन ते तीन दिवसात निर्णय होवू शकतो. माणिकडोह धरणातून येडगावकडे फिडींग सुरु झाले असून पिंपळगावजोगेचा निर्णयाबाबत २५ मे रोजी नेते व शेतकऱ्यांशी चर्चा होणार असल्याचे समजते."

- स्वप्निल काळे, कार्यकारी अभियंता, कुकडी विभाग श्रीगोंदे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com