esakal | बनावट कागदपत्रांद्वारे विदेशी नागरिकांकडून मालमत्ताखरेदी! माहिती अधिकारात पोलखोल
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट कागदपत्रांद्वारे विदेशी नागरिकांकडून मालमत्ताखरेदी

याप्रकरणी जिल्हाधिकारी यातील दोषींवर काय कारवाई करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे विदेशी नागरिकांकडून मालमत्ताखरेदी

sakal_logo
By
प्रा. सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : भारतात पर्यटक म्हणून आलेल्या विदेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांद्वारे झालेला अरणगाव (ता. नगर) येथील गट क्रमांक ५४८ मधील मालमत्ता विक्रीचा व्यवहार बेकायदेशीर असल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट होताना दिसत आहे. तसा अहवाल संबंधित चौकशी अधिकाऱ्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी यातील दोषींवर काय कारवाई करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (the sale of property by foreign nationals through forged documents has made it clear that the transaction is illegal)

हेही वाचा: चिंताजनक! नगर जिल्ह्यामध्ये जून महिन्यात वाढले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

विदेशी (न्यू यॉर्क, अमेरिका) नागरिकांना मालमत्ता विक्री, या बेकायदेशीर प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी पुराव्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत गायके यांनी तक्रारीत अरणगाव येथील गट क्रमांक ५४८, दस्त क्रमांक २१९७ /२०१५, तसेच दस्त क्रमांक १३५२/२०१६ अन्वये दुय्यम निबंधक, नगर येथे मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला. यात खरेदी घेणार हे न्यू यॉर्कमधील (अमेरिका) नागरिक असून, ते पर्यटक व्हिसावर भारतात आलेले आहेत. भारतामध्ये आलेल्या अशा नागरिकांना मालमत्ता खरेदी करता येत नाही. मात्र, बनावट कागदपत्रे सादर करीत प्राप्तिकर विभागाचे बनावट कार्ड तयार करून हा बेकायदेशीर प्रकार झाला असल्याचा दावा केला होता.

हेही वाचा: खाद्यतेलाच्या अपहारप्रकरणी दोघांना अटक; मुद्देमाल हस्तगत

तसेच, खरेदी घेणाऱ्या विदेशी नागरिकांमध्ये आमी सुझान वालीन, तसेच गॅरी क्‍लायनर (दोन्ही रा. अरणगाव, ता. नगर) यांचा समावेश असून, यांना खरेदी देणारे व साक्षीदार हे अरणगाव व वाळकी येथील रहिवासी आहेत. बेकायदेशीर खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्ती व दस्त नोंदविणारे दुय्यम निबंधक यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही तक्रार अर्जात केली होती.

दरम्यान, हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशीसाठी नगर तालुका तहसीलदारांकडे चौकशीसाठी पाठविले. तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांनी संयुक्तरीत्या चौकशी करून तो अहवाल वरिष्ठांना पाठविला. त्यात त्यांनी चौकशी केली असता, फेरफार क्रमांक ५२१० व ५६२५ नुसार विदेशी नागरिकांनी विषयांकित प्लॉटचे विनापरवाना खरेदीखत केलेले दिसून आले. खरेदी-विक्रीसाठी कुठलेही परवानगी घेतलेली दिसून येत नाही. याप्रकरणी उचित कार्यवाही करावी, असे स्पष्ट म्हटलेले आहे. यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचे वाटते.

हेही वाचा: आंदोलनानंतरही वाळूतस्करी सुरुच! प्रवरापात्रातून गाढवांद्वारे वाळूवाहतूक

राज्यपालांकडे परवानगी मागितली : गायके

याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मागणी करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आपण यातील खरेदी-विक्रीदारांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी राज्यपालांकडे परवानगी मागितली असल्याचे तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्ता काकासाहेब गायके यांनी सांगितले.

हेही वाचा: जिल्हा परिषदेतील गर्दीला लागणार लगाम

विदेशी नागरिकांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीप्रकरणी चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. प्रथमदर्शनी हा व्यवहार विनापरवाना असल्याचे वाटते. याबाबत चौकशीअंती वरिष्ठच निर्णय घेतील.

- उमेश पाटील, तहसीलदार, नगर तालुका

(the sale of property by foreign nationals through forged documents has made it clear that the transaction is illegal)

loading image
go to top