वखारीतील कांद्यावर चोरांनी मारला डल्ला 

दत्ता उकीरडे
Wednesday, 28 October 2020

करमनवाडी (ता. कर्जत) येथील सुरेश गुलाब सायकर यांच्या शेतातील चाळीतून चोरांनी सुमारे 75 हजार रुपयांचा 25 गोण्या कांदा लंपास केला.

राशीन (अहमदनगर) : करमनवाडी (ता. कर्जत) येथील सुरेश गुलाब सायकर यांच्या शेतातील चाळीतून चोरांनी सुमारे 75 हजार रुपयांचा 25 गोण्या कांदा लंपास केला. 

भाववाढीच्या अपेक्षेने सायकर यांनी हा कांदा वखारीत साठवून ठेवला होता. चोरांनी वखार फोडून, त्यातील तब्बल 25 गोण्या कांदा लंपास केला. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत अंदाजे 70 ते 75 हजार रुपये एवढी आहे. निसर्गाने दिलेले हिरावून नेले; मात्र नशिबाचीदेखील चोरी होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. केवळ रोख रक्कम, सोनेचोरीचे प्रकार समोर येतात. मात्र, आता शेतमालाच्या चोरीचा हा "पॅटर्न' शेतकऱ्यांना हादरा देणारा आहे. लॉकडाउन, बाजारभाव, अतिवृष्टीमुळे भरडून निघालेला शेतकरी अशा घटनांमुळे नुकसानीच्या खाईत जात आहे.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of onion from Suresh Saikar field in Rashin