esakal | घोडेगावकडे भरधाव वेगात जाणारा टेम्पो पोलिसांनी अडवला... त्यात पाहिले तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Theft of tempo sandalwood speeding towards Ghodegaon in Nevasa taluka

सोनई पोलिसांनी चंदन तस्कराच्या मुसक्या आवळत एक टेम्पोसह साडेसोळा किलो ४१ हजार किमतीचे चंदन जप्त केला.

घोडेगावकडे भरधाव वेगात जाणारा टेम्पो पोलिसांनी अडवला... त्यात पाहिले तर...

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : सोनई पोलिसांनी चंदन तस्कराच्या मुसक्या आवळत एक टेम्पोसह साडेसोळा किलो ४१ हजार किमतीचे चंदन जप्त केला. पोलिसांनी ही कारवाई घोडेगाव- चांदे या रस्त्यावर  शुक्रवारी (ता. १७) रोजी रात्री एक- दीड वाजण्याच्या सुमारास सापळा रचून केली. दरम्यान यातील संशयित आरोपींना नेवासे न्यायालयाने पाचदिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोनई पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पोलिस पथकासह नगर- औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव येथील चौकात चांदे रोडवर शुक्रवारी रात्री एक- दीडच्या दरम्यान सापळा रचला. या दरम्यान चांदेकडून (ता. नेवासा) घोडेगावकडे भरधाव वेगात जाणारी टेम्पो पोलिसांनी अडवला.
पोलिसांनी वाहनांची झडती घेत वाहनात खालील चोर कप्प्यात गोंण्यामध्ये असलेले ४१ हजार २५० रुपयांचे किंमतीचे साडेसोळा किलो चंदन जप्त करण्यात आले. पोलिसांनी चंदन तस्कर बाळासाहेब हरिभाऊ गायकवाड व वाहनचालक पोपट जगन्नाथ पुंड ( दोघे रा. चांदे, ता. नेवासे) या दोघांना अटक केली. शनिवारी त्यांना नेवासे न्यायालयात हजर केले असता त्यांना (ता. २२) जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image