शाळेत मुलेच नाहीत मग शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती का?

मार्तंड बुचुडे
Sunday, 1 November 2020

शाळा सुरू झाल्या नाहीत तरी सुद्धा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शाळेमध्ये 50 टक्के शिक्षाकांना 50 टक्के उपस्थिती राहाण्यासाठी सक्ती केली आहे. मात्र शाळेत मुलेच नाहीत तर शिक्षकांना उपस्थीतीची सक्ती कशासाठी? असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थीत केला जात आहे.

पारनेर (अहमदनगर) : शाळा सुरू झाल्या नाहीत तरी सुद्धा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शाळेमध्ये 50 टक्के शिक्षाकांना 50 टक्के उपस्थिती राहाण्यासाठी सक्ती केली आहे. मात्र शाळेत मुलेच नाहीत तर शिक्षकांना उपस्थीतीची सक्ती कशासाठी? असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थीत केला जात आहे. अनेक शिक्षकांनी कोरोना योद्धा म्हूणून जीव धोक्यात घालून काम केले आहे, मग आता पुन्हा शिक्षकांच्या आरोग्याशी खेळू नये, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मात्र शाळा बंद असल्या तरीही ऑनलाईन शिक्षण तसेच इतरही शालेय कामे सुरू आहेत. त्याच बरोबर अनेक शिक्षकांवर कोरोना काळात विविध ठिकाणी चेक नाके, कोविड सेंटर व कोरोना रूग्णांचा सर्वे आदी कामे दिली होती. त्यामुळे शिक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना योद्धा म्हणूम अनेक शिक्षकांनी चांगली जबाबदारी सांभाळली आहे. 

आता नुकताच शिक्षण विभागाच्या वतीने 50 टक्के शिक्षकांना शाळेत उपस्थीत राहाण्याचा आदेश काढला आहे. मात्र जर शाळेत मुलेच नाहीत तर आम्ही शाळेत जाऊन काय करणार असा प्रश्न उपस्थीत होत आहे. आम्ही घरी राहूनही इतके दिवस ऑनलाईन शिक्षण घेतच आहोत तर मग घरा राहून काम सुरू आहे तर शाळेत कसासाठी जावयाचे यातून जर शिक्षकांना कोरोनाची लागण झाली तर याला जबाबदार कोण असाही प्रश्ऩ उपस्थीत होत आहे.

अनेक शाळामध्ये कोविड सेंटर होती अद्याप त्या शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले नाही. तसेच शाळेत शिक्षकांच्या आरोग्याच्या सुरक्षततेसाठी कोणत्याही सुविधा नाहीत अशा वेळी शिक्षकांना विनाकारण शाळेत बोलविणे योग्य नसल्याच्या भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहेत. यातून शिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. 

शाळा सुरू करण्यापुर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करावे, शिक्षकांना कोरोना विरोधात घ्यावयाच्या मुलांच्या व स्वताःच्या काळजीविषयी प्रशिक्षण द्यावे, शाळामधील वर्गखोल्या व स्वच्छतागृह यांच्या स्वच्छेतसाठी शाळांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. एका वर्गात अधिक मुले असल्याने वर्ग खोल्यांच्या अडचणी आहेत. त्यासाठी योग्य ते नियोजण करावे व मगच शाळा सुरू कारव्यात, असे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचित अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are no children in the school so why 50 percent attendance of teachers