esakal | चौकशी अहवाल आला, शिक्षक बँक घड्याळ खरेदीत काळेबेरे नाही
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक शिक्षक बँक, नगर

घड्याळवाटपातील तांत्रिक कारणांना गैरव्यवहाराचे नाव देऊन विरोधकांनी गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या दिल्या.

चौकशी अहवाल आला, शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदीत काळेबेरे नाही

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर ः ""जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या शताब्दी वर्षानिमित्त केलेली घड्याळखरेदी पारदर्शक झाली आहे, असा स्पष्ट अहवाल चौकशी समितीने दिला आहे. शिक्षक बॅंकेचा कारभार सभासदहिताचा व काटकसरीचा राहिला आहे. विरोधकांनी बदनामीसाठी केेलला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे,'' असं मत शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी व्यक्त केलं.

घड्याळवाटपातील तांत्रिक कारणांना गैरव्यवहाराचे नाव देऊन विरोधकांनी गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या दिल्या. जिल्हा निबंधक कार्यालयाकडे तक्रारी करून चौकशीची मागणी केली. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी खेडकर चौकशी अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. त्यांनी विरोधकांनी केलेले आरोप व बॅंकेत झालेली घड्याळखरेदी प्रक्रिया याची वस्तुस्थिती व पुरावे पाहिले. शिक्षक बॅंकेने कंपनीशीच थेट करार करून घड्याळखरेदी केली. ही सर्व प्रक्रिया पारदर्शी झाली आहे, असा स्पष्ट उल्लेख चौकशी अहवालात नमूद केलेला आहे.''(There is no malpractice in buying watches from Ahmednagar Teachers Bank)

हेही वाचा: मराठा आरक्षणासाठी केंद्राकडेही जाऊ, आधी एक व्हा - विखे पाटील

जिल्हा शिक्षक संघाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालक मंडळ सभासदहिताचे कार्य करीत आहे. अंध भक्तांनी आता तरी सत्य स्वीकारून बॅंकेची बदनामी करू नये, असे आवाहन गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी केले आहे.

या पत्रकावर शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, राजू राहणे, अर्जुन शिरसाठ, उषा बनकर, विद्या आढाव, बाळासाहेब मुखेकर, किसन खेमनर, गंगाराम गोडे, सुयोग पवार आदी संचालकांच्या सह्या आहेत. (There is no malpractice in buying watches from Ahmednagar Teachers Bank)