
राजळे घराण्यातील सत्तासंघर्ष कारखान्याच्या निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे.
पाथर्डी : श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी एकही उमेदवारीअर्ज दाखल झाला नाही.
आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ विकास मंडळाच्या माध्यमातून बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादीचे शिवशंकर राजळे निवडणूक लढविण्याचा तयारीत आहेत.
आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असून, 13 जानेवारीपर्यंत त्यासाठी मुदत आहे. दाखल अर्जाची 14 जानेवारीला छाननी, 15 ते 29 जानेवारीपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून, 12 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हूणन प्रांताधिकारी देवदत्त केकाण काम पाहत आहेत.
गेल्या 15 वर्षांपासून कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याची पंरपरा आहे. ती यंदाही कायम राहते की निवडणूक होते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. राजळे घराण्यातील सत्तासंघर्ष कारखान्याच्या निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार राजळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. अहमदनगर