श्री विशाल गणपती मंदिरात मास्कशिवाय प्रवेश नाही

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

देवस्थानातर्फे भाविकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नगर ः ग्रामदैवत श्रीविशाल गणेश मंदिर सोमवार उघडले. या पार्श्‍वभूमीवर श्रीविशाल गणेश मंदिर देवस्थानाच्या ट्रस्टची काल सायंकाळी अध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीत तोंडाला मास्क असल्याशिवाय कोणत्याही भाविकास मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

देवस्थानातर्फे भाविकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सॅनिटायझर लावल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर सकाळी 9 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत भाविकांसाठी खुले असेल.

आरतीच्या वेळेत कोणालाही प्रवेश नसेल. एका वेळी फक्त 15 भाविकांना मंदिरात सोडले जाईल. ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षांखालील मुलांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले.

उपाध्यक्ष पंडित खरपुडे, विजय कोथिंबीर, हरिश्‍चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, पांडुरंग नन्नवरे आदी उपस्थित होते. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no entrance to Shri Vishal Ganapati Temple without a mask