नगर शहरात आज व उद्या पाणीपुरवठा विस्कळीत; कोणत्या भागात येणार नाही पाणी वाचा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील विळद पंपिंग स्टेशन येथील एक पंप काल नादुरुस्त झाला.

नगर : अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील विळद पंपिंग स्टेशन येथील एक पंप काल नादुरुस्त झाला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आज आणि उद्या विस्कळीत राहणार आहे, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. 

गुरुवारी (ता. 5) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या सिद्धार्थ नगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रस्ता, तोफखाना, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार, स्टेशन रस्ता, विनायक नगर, बालिकाश्रम रस्ता, सावेडी उपनगर आदी भागाला पाणीपुरवठा होणार नाही. या भागाला शुक्रवारी (ता. 6) पाणीपुरवठा करण्यात येईल.

शुक्रवारी (ता. 6) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहरातील झेंडी गेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, कोठला, माळीवाडा, सारसनगर, बुरुडगाव आदी भागाला शनिवारी (ता. 7) पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be no water supply in the city today and tomorrow