esakal | हातगावातील दरोड्यात दोन जखमी, सोने-नाणे लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

हातगाव येथे दरोडा

हातगावातील दरोड्यात दोन जखमी, सोने-नाणे लंपास

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील हातगाव येथे पाच ते सहा दरोडेखोरांनी केलेल्या जबर मारहाणीत पिता-पुत्र जबर जखमी झाले. शनिवार (ता. १९)ला रोजी पहाटे दरोडेखोरांनी घराचा मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी दोघांना जबर मारहाण करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तू आदी ऐवज लांबविला.

दिलीप रामराव झंज (वय ६५) प्रकाश दिलीप झंज (वय ३१ दोघेही रा. हातगाव, ता. शेवगाव) हे दरोडोखोरांच्या मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हातगाव (ता. शेवगाव) येथील रामराव झंज हे आपल्या कुटूंबासह गावच्या मध्यवस्तीत राहतात. शक्रवार (ता. १८)ला रोजी रात्री कुटूंबातील सर्वजण घरात झोपले असता शनिवारी (ता.१९) पहाटे तीनच्या सुमारास घराचा मागील बाजुचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. (Thieves beat two persons at Hatgaon in Shevgaon taluka)

हेही वाचा: याला काय म्हणावं ः डॉक्टरनेच पत्नीवर केली काळी जादू

एका खोलीला बाहेरुन कडी लावून दुसऱ्या खोलीत प्रवेश करत साहित्याची उचकापाचक करून सोन्याचे दागिने व रोख रक्कमेची चोरी करत असताना दिलीप व प्रकाश यांना जाग आल्याने त्यांनी प्रतिकार केला. मात्र, दरोडेखोरांनी कुऱ्हाडीने डोक्यावर मारहाण करत त्यांना जखमी केले. त्याच वेळी घरातील महिलांनी आरडाओरड केल्याने दरोडेखोर पळून गेले.

दोघा जखमींना ग्रामस्थांनी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले. त्यानंतर हातगावमधील गहिनीनाथ अभंग, सत्यनारायण साखरे, बबन गोसावी इतर दोन अशा पाच ठिकाणी दरोडेखोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरीकांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला.

या बाबत माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा आदींनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर नगर येथील ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत कुठल्याही प्रकारच्या गुन्हा दाखल झाला नाही.

चार वर्षांपूर्वीची घटना आठवली

चार वर्षापूर्वी हातगाव येथील बर्गे यांच्या वस्तीवर आठ ते नऊ दरोडेखोरांनी मारहाण करत सात जणांना जबर जखमी केले. तर सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरुन नेली होती. काल रात्री आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी तिच पध्दत वापरत झंज कुटुंबातील दोघांना जबर जखमी केले. चोरटयांची संख्या, हत्याराच्या सहाय्याने मारहाण करुन चोरी करण्याच्या पध्दतीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Thieves beat two persons at Hatgaon in Shevgaon taluka)

loading image