वडनेर येथील शेतकरी वाळूंज यांची सहा एकर क्षेत्रात सिताफळाची बाग आहे. सिताफळांना सध्या चांगली मागणी असून सुमारे ८० ते १०० रूपये किलो दर आहे. वाळूंज यांच्या बागेतील झाडांना चांगली फळे लागली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सहा नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या बागेतील सुमारे २०० कॅरेट सिताफळे चोरून नेली.
पारनेर (नगर) : वडनेर हवेली येथील शेतकरी आबासाहेब वाळुंज यांच्या सहा एकर बागेतून सुमारे दोनशे कॅरेट सिताफळे चोरट्यांनी रात्री अंधाराचा फायदा घेत चोरून नेली. मात्र शेतकरी पोलिस ठाण्यात फिर्य़ाद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी टाळाटाळ केली. सध्या सिताफळास चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी अता फळबागांकडे आपला मोर्चा वळविला आहे.
वडनेर येथील शेतकरी वाळूंज यांची सहा एकर क्षेत्रात सिताफळाची बाग आहे. सिताफळांना सध्या चांगली मागणी असून सुमारे ८० ते १०० रूपये किलो दर आहे. वाळूंज यांच्या बागेतील झाडांना चांगली फळे लागली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सहा नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या बागेतील सुमारे २०० कॅरेट सिताफळे चोरून नेली.
सध्याच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे दोन लाख रूपयांची ही सिताफळे असावीत. त्यामुळे या शेतक-यांने या बाबत पोलिसांना तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरूवातीस पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. नंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी यात लक्ष घातले व त्यांनी उशीराने दुस-या दिवशी सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करून घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या पाऊसाने शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच अता शेतक-यांच्या शेतातील फळेही चोरी जाऊ लागल्याने शेतक-यांना वेगळ्याच संकटास सामोरे जावे लागत आहे. या पुर्वीही तालुक्यातून अनेक शेतक-यांचा कांदा, चंदनाची झाडे डाळींबाची फळे चोरीस गेली आहेत आता मात्र सिताफळे चोरीस गेली आहेत. त्यामुळे शेतक-यांनी सतर्क राहाणे गरजेचे आहे. भुरट्या चो-या करणा-या चोरट्यांनी आता आपला मोर्चा शेतीमालाकडे वळविला असल्याचे या वरूऩ दिसून येत आहे.
अखेर पोलिस निरीक्षक भोसले यांनी फिर्याद दाखल करून घेतली मात्र शेतक-याच्या म्हणणे असे आहे की, सुमारे दोन लाखाची सिताफळे चोरीस गेली आहेत. मात्र पोलीस ठण्यात एक हजार एकशे 50 किलो सुमारे 74 हजार सातशे 50 रूपयांची सिताफळे चोरी गेल्याची फिर्य़ाद दाखल करून घेतली आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले