Ahmednagar : थोरात कारखान्याचे काम दिशादर्शक ; गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar-Gaikwad

थोरात कारखान्याचे काम दिशादर्शक ; गायकवाड

संगमनेर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक, सभासद व कामगारांचे हित जोपासत केलेले काम इतर सर्व सहकारी साखर कारखान्यांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्‍गार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.

गायकवाड यांनी थोरात कारखान्याल सपत्नीक भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाया घातलेली सहकार चळवळ ग्रामीम भागाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करुन गेली. त्यांचे अनुकरण करीत दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी हा कारखाना आदर्श तत्वांच्या पायावर भक्कमपणे उभा केला. त्यांच्याच मार्गदर्शक तत्त्वांवर वाटचाल करत महसूलमंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखाना चांगले काम करतो आहे. साडेपाच हजार मेट्रिक टनाचा नवीन कारखाना, ३० मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प इतरांसाठी दिशादर्शक ठरला आहे. नवीन इथेनॉल व ऑक्सिजन प्रकल्पाचे कामही सुरू आहे.

कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक रमेश गुंजाळ, चंद्रकांत कडलग, भास्कराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, संभाजी वाकचौरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, नवनाथ गडाख आदी उपस्थित होते.

loading image
go to top