काळजी वाढली : नगर जिल्ह्यात दररोज हजाराचा आकडा

Thousands of corona infected daily in Ahmednagar district
Thousands of corona infected daily in Ahmednagar district

नगर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात नगर शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रोफेसर कॉलनी चौकात रस्त्यावर उतरून व्यावसायिक व नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत काल 1100 जणांची भर पडली. 

जिल्ह्यात काल 599 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 85 हजार 652 झाली आहे. आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत 1100 ने वाढ झाल्याने, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही 6385 झाली आहे. यात नगर शहरातील सर्वाधिक 399 रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, ही बाब लक्षात घेऊन महापौर बाबासाहेब वाकळे सोमवारी (ता. 29) प्रोफेसर कॉलनीत गेले. त्यांच्या समवेत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, महापालिका दक्षता पथकाचे प्रमुख परिमल निकम, शशिकांत नजान यांच्यासह महापालिका कर्मचारी होते. महापौरांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना तंबी दिली. रात्री आठनंतर संचारबंदी असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होतो. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेमध्ये 332, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 395 व अँटिजेन चाचणीत 373 रुग्ण बाधित आढळले. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील 190, अकोले 11, जामखेड 40, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 15, नेवासे 6, पारनेर 1, पाथर्डी 7, राहता 27, राहुरी 4, संगमनेर 17, श्रीगोंदे 4, श्रीरामपूर 2, भिंगार 2 तर अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 
खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्यांत नगर शहरातील 156, अकोले 11, जामखेड 1, कर्जत 4, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 30, नेवासे 6, पारनेर 9, पाथर्डी 6, राहाता 34, राहुरी 16, संगमनेर 41, शेवगाव 10, श्रीगोंदे 2, श्रीरामपूर 47, भिंगार 7, तसेच अन्य जिल्ह्यांतील 4 रुग्णांचा समावेश आहे. 

अँटिजेन चाचणीत बाधित आढळलेल्यांमध्ये नगर शहरातील 53, अकोले 23, जामखेड 30, कर्जत 68, कोपरगाव 7, नगर ग्रामीण 18, नेवासे 12, पारनेर 11, पाथर्डी 14, राहाता 32, राहुरी 45, संगमनेर 14, शेवगाव 5, श्रीगोंदे 10, श्रीरामपूर 29, तसेच भिंगारमधील 2 रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेले रुग्ण : 85652 
उपचार सुरू असलेले रुग्ण : 6385 
मृत्यू : 1205 
रुग्णसंख्या : 93242 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com